जबाबदारी स्विकारणेविभाग दोन :
आपले आयुष्य आपण कसे जगतो किंवा आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने घटना घडतात हे थोडक्यात आपण पाहिले. या विभागात आपण आपले आयुष्य जगावे कसे, अपेक्षित यश मिळण्यासाठी, आपल्या समस्या सोडविण्यासाठी, चिंतामुक्तीसाठी काय करायला हवे हे आपण पाहू.जबाबदारी स्विकारणे :
जबाबदारी स्विकारणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही जबाबदारी कितीही लहान असो वा कितीही मोठी, ती जबाबदारी उचलण्यासाठी सदैव तयार रहा. घरातील अगदी लहान सहान कामे करतानाही पुढाकार घ्या. ही लहान कामे करतानाही हे काम महत्त्वाचे आहे असा विचार करा तसेच आपल्याला हे काम करताना किती वेळ लागतो याकडे लक्ष द्या. सुरूवातीला तुम्हाला त्रास वाटेल किंवा कंटाळा येईल मात्र जबाबदारी टाळू नका. थोड्याच दिवसात तुमचा त्रास, कंटाळा निघून जाईल व तुम्हांला त्यात मजा वाटू लागेल. या लहान सहान जबाबदार्‍या पार पाडताना तुम्हांला अनेक गोष्टी समजतील, माहिती मिळेल ज्याचा उपयोग तुम्हाला भावी काळात अनेक समस्या सोडविण्यासाठी होईल.

No comments:

Post a Comment