प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणे
बर्‍याच वेळेला असे होते की हे काम छोटेसे आहे हे नंतर करूया असा आपण विचार करतो त्यामुळे आपल्या मेंदूला असे वाटते की हे काम कमी महत्त्वाचे आहे त्यामुळे आपला मेंदू ते काम विसरून जातो. यातून बर्‍याच वेळेला असे होते की त्या छोट्याशा कामावर अवलंबून असलेले दुसरे मोठे काम खोळंबते व आपल्याला वाटू लागते की हे काम त्याचवेळी लगेचच केले असते तर बरे झाले असते. म्हणून साधे व छोटेसे कामदेखील महत्त्वाचे आहे असा विचार तुम्ही करू लागलात तर तुमचे कामही वेळच्यावेळी होईल व तुमचा मेंदूही नेहमी सतर्क राहील.
            बर्‍याचवेळेला आपण 'हे काम लगेच होणार नाही, वेळ लागेल, मला तेवढा वेळ नाही' असे म्हणत अनेक कामे टाळतो पण जेव्हा आपण प्रत्यक्षात करायला जातो तेव्हा लक्षात येते की अरो हे काम तर लगेच झाले, उगीच इतके दिवस टाळाटाळ केली. यासाठीच तेवढा वेळ नाही म्हणून एखादे काम टाळत असाल तर थोडं थांबा, विचार करा की खरंच या कामाला खूप वेळ लागणार आहे का? खरंच आपल्याकडे तेवढा वेळ नाही का? हे काम आपण रोज थोडे थोडे करून पूर्ण करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधा म्हणजे तुमची अनेक कामे वेळच्या वेळी पूर्ण होतील.

No comments:

Post a Comment