नमस्कार !नमस्कार ! खरंतर आयुष्य कसे जगावे किंवा यशस्वी कसे व्हावे यासाठीची अनेक पुस्तके बाजारात मिळतात. अनेक कार्यक्रम विविध नाट्यगृहांतून पाहायला मिळतात. तरीदेखील मी हे पुस्तक लिहायला का घेतले? मी देखील बाजारात मिळणारी काही पुस्तके वाचली आहेत. कार्यक्रम पाहिले आहेत. अशा पुस्तकांमधून, कार्यक्रमांमधून मोठ्या व्यक्तींची उदाहरणे दिली जातात. त्यांच्यासमोर कोणकोणती आणि किती संकटे आली, त्यावर मात करून, खूप कष्ट घेऊन ते आज एवढे मोठे बनले आहेत असे सांगितले जाते. पण खरंच केवळ अपार कष्ट करून कोणी . पी. जे. अब्दुल कलाम बनेल? लता मंगेशकर बनेल? अमिताभ च्च बनेल? सचिन तेंडुलकर बनेल? याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. कारण तसे असते तर आज आपल्या देशात एकच लता मंगेशकर, एकच अमिताभ च्च, एकच सचिन तेंडुलकर नसते. मला तर वाटते अशा व्यक्ती जन्मालाच येतात असे काहीतरी मोठे करण्यासाठी.
            हे तर तुम्हीही मान्य कराल की कष्टाबरोबरच जन्मजात गुण, हे गुण खुलून येण्यासाठी क़िंवा या गुणांचे चीज होण्यासाठी आवश्यक संधी अथवा आजूबाजूची परिस्थिती अशा अनेक इतर गोष्टी कारणीभूत असतात आणि या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या असतात. त्यामुळे मी मोठा होऊन अब्दुल कलाम, लता मंगेशकर, अमिताभ च्च, सचिन तेंडुलकर किंवा यांच्यासारख्या इतर एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखे बनेन असा विचार तुमच्या मनात असेल तर तो आधी काढून टाका. कारण यांच्यासारखे बनणे म्हणजेच मोठे होणे किंवा यशस्वी होणे असे नाही. यश मिळविताना तुम्ही किती संकटांचा सामना करता यावर तुमच्या यशाचे मोजमाप ठरते. अतिशय विपरीत परिस्थितीत तुम्ही मिळवलेले छोटेसे यश एखाद्याने कमी अडचणींचा सामना करून मिळवलेल्या यशापेक्षा मोठे ठरते.
            या पुस्तकाच्या विभाग एकमध्ये मी अशा गोष्टी मांडल्या आहेत ज्यावर आपण विश्वास ठेवतो, आपल्या जीवनावर त्यांचा प्रभाव पडतो. या गोष्टींचे मी विविध गटात वर्गीकरण केले आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्या गटात बसता याचा विचार प्रथम तुम्ही करायचा आहे. पुस्तकाच्या दुसर्या विभागात आपण आपले आयुष्य जगावे कसे, अपेक्षित यश मिळण्यासाठी, आपल्या समस्या सोडविण्यासाठी, चिंतामुक्तीसाठी काय करायला हवे याबद्दल मी लिहिलेले आहे.

No comments:

Post a Comment