जरूर वाचा
काहीजणांना हा प्रश्न पडला असेल की या विषयावरची इतर पुस्तके मोठमोठी आहेत. मग हे पुस्तक लहान का? याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मी या पुस्तकात माझे म्हणणे थोडक्यात व नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयावरची जी पुस्तके मी वाचली आहेत, त्यापैकी काही पुस्तकांत हे करा, ते करा असे एका पाठोपाठ मुद्दे मांडले आहेत तर काही पुस्तकांत मुद्दे इतके विस्तृतपणे मांडले आहेत की वाचणारा फक्त वाचतच राहतो, त्याच्या मनातले प्रश्न अनुत्तरितच राहतात. दुसरे कारण म्हणजे अशा पुस्तकांचा परिणाम काही दिवसच टिकतो मग असे पुस्तक पुन्हा वाचण्याची गरज पडते; मात्र मोठे पुस्तक पुन्हा वाचणे शक्य होत नाही, आपण टाळाटाळ करू लागतो. या गोष्टींची काळजी मी या पुस्तकात घेतली आहे.

No comments:

Post a Comment