श्रद्धा, विश्वास
आपण पाहतो आजकाल देवाचे प्रस्थ फार वाढले आहे. देव आहे किंवा नाही हा वादाचा मुद्दा आहे. त्याऐवजी आपण वेगळा विचार करूया. आपल्याला माहितच आहे काहीजणांची गणपतीवर श्रद्धा असते, काहीजणांची शंकरावर, काहीजणांची दत्त महाराजांवर, कोण म्हणतो मला साईबाबा पावतात, कोण म्हणतो मला तिरूपतीचा चांगला अनुभव आला, कोण म्हणतो मला स्वामी समर्थांचा चांगला अनुभव आला तर कोणी महालक्ष्मीला पूजतो. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या देवांचा वेगवेगळा अनुभव येतो. एकाला एका देवाचा चांगला अनुभव आला म्हणून दुस-याला येईलच असे नाही. तो म्हणतो मला दुस-या देवाचा अनुभव चांगला आला. . हे झाले हिंदू धर्माबाबत. मुस्लिम धर्मात देवाला आकार नसतो असे मानले जाते, शीख लोक गुरू नानकांची पूजा करतात, ख्रिश्चन येशू ख्रिस्तांची पूजा करतात, जैन लोक महावीर, बौद्ध गौतम बुद्धांची पूजा करतात. प्रत्येक देवाची पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये काही प्रमाणात फरक असतो. प्रत्येक देवाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. याचबरोबर या देवांची मूर्ती दगडाची असते. गणेशोत्सवात आपण प्लॅस्टर ऑफ पॅरीसची किंवा शाडूची मूर्ती आणतो, काहीजण फोटोची पूजा करतात, देव्हा-यात पितळेच्या, चांदीच्या मूर्ती असतात. म्हणजेच देवांच्या रूपात, देवाची मूर्ती कशापासून बनली आहे त्यात, पूजेची पद्धत, देवाला कोणता नैवेद्य दाखवावा यामध्ये विविधता आहे. या सर्वांमध्ये एकच गोष्ट साम्य आहे ती म्हणजे त्या देवावरील श्रद्धा, विश्वास. देव मला सर्व संकटांतून पार नेईल, देवाला नमस्कार करून सुरू केलेले माझे काम नक्कीच यशस्वी होईल हा विश्वासच आपला आत्मविश्वास वाढवतो, एक नवी ऊर्जा आपल्याला मिळते व चांगल्या घटना घडण्याची शक्यता वाढते.
म्हणूनच देव आहे नाही या वादात पडण्याऐवजी किंवा डोक्यात गोंधळ घालून घेण्याऐवजी देवावर श्रद्धा ठेवा. आपण काही सेकंदांसाठीच देवासमोर हात जोडतो तेवढ्या सेकंदांसाठी पूर्ण श्रद्धेने नमस्कार करा. पण हा नमस्कार करताना आपल्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार करू नका. कोणतेही मागणे मागू नका. देव सर्वज्ञानी आहे. तो सर्वत्र आहे. तो तुमच्या मनातले सर्व ओळखू शकतो. त्यामुळे तुमच्याबद्दल त्याला काही सांगण्याची गरज नाही. मनात कोणताही विचार न ठेवता त्याच्यावर विश्वास ठेवून नमस्कार क़रा. आपल्याला एक मानसिक समाधान लाभेल. जे आपल्या नकळत खूप फायदेशीर ठरते.
            पण आपण जेव्हा एखाद्या देवळात जातो तेव्हा तेथे नमस्कार करताना मानसिक समाधान मिळणे गरजेचे आहे. ब-याच ठिकाणी आपण तासनतास रांगेत उभारतो आणि जेव्हा देवाजवळ पोहोचतो तेव्हा तेथे एकजण 'चला, पुढे चला, आवरा' असे ओरडत हाकलत असतो. काही ठिकाणी पुजारी 'दक्षिणा टाका' म्हणून ओरडतानाही पाहिले आहे. अशा गोंधळात नमस्कार करून काय उपयोग? त्याऐवजी ज्या मंदिरात आपण शांतपणे, पूर्ण मानसिक समाधानाने नमस्कार करू शकतो अशा ठिकाणी जा. तुम्हाला अधिक फायदा होईल.
            तुम्हांला जर देवाला नवस बोलायची सवय असेल तर ती बंद करा. कारण ब-याच वेळा नवस फेडायचे राहून जाते किंवा नवस फेडल्यानंतर एखादी वाईट घटना घडली की आपला नवस नीट फेडला गेलाय की नाही, दुस-या एखाद्या देवाला आपण नवस बोलला नव्हता ना? अशा नाना शंकांनी मन भरून जाते, मनात भिती साठते व आपले मानसिक खीकरण होते. कोणताही देव नवस बोलल्यावर किंवा तुम्ही मला काहीतरी दिले तरच मी तुमचे काम करणार असे म्हणत नाही किंवा तो कधी कुणाचे वाईटही करत नाही. हा स्वभाव माणसाचा आहे. देव असे करत असता तर देव आणि माणूस यात फरक राहिला नसता. देव क्षमाशील आहे हे लक्षात ठेवा. काही लोकच देवाबद्दल तुमच्या मनात गैरसमज व भिती घालून स्वतःचा फायदा करून घेत असतात.
            काहीजण एखाद्या साधू बाबाच्या मागे लागलेले आपण पाहतो. देवाचा अवतार मानून आपण त्यांना पूजतो. त्यांचा फोटो घरात आणून ठेवतो. तुम्ही जर अशा लोकांपैकी एक असाल तर थोडा विचार करा. ज्यावेळीपासून तुम्ही अशा साधू बाबांवर विश्वास ठेवू लागला, त्यांचा फोटो आणून घरात ठेवला, त्यानंतर सुरूवातीला तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडल्या असतील मात्र नंतर एकापाठोपाठ वाईट घटना घडल्या असतील, तुम्हांला त्रास सुरू झाला असेल की जेणेकरून तुम्ही त्या साधू बाबांच्या जास्त आहारी गेला असाल. तुम्हांला हा अनुभव आला असेल तर तात्काळ त्या साधूबाबांपासून दूर रहा. त्यांचा फोटो घरात ठेवू नका.
            आता आपण एक महत्त्वाचा प्रयोग करून पाहूया.

No comments:

Post a Comment