गरज
तहान लागली की विहीर खणणे, नाकापर्यंत पाणी आल्यावर हातपाय मारणे अशी वाक्ये आपण बर्‍याच वेळेला ऐकतो. यातून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा आपल्यासमोर गरज निर्माण होते तेव्हा इतरवेळी टाळत असलेली कामेदेखील आपण पटकन करतो. याबरोबरच गरज ही शोधाची जननी आहे. गरजेतूनच नवनवीन गोष्टी माहीती होतात. यासाठीच एखादे काम किंवा एखादी जबाबदारी आपण टाळत असू तर हे काम करणे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे, हे काम आत्ताच्या आत्ता करणे खूप गरजेचे आहे, मला या कामाचा भविष्यात खूप उपयोग होणार आहे असा विचार करा. यामुळे तुमची कामे वेळच्यावेळी व व्यवस्थित पूर्ण होतील.

No comments:

Post a Comment