मला हे काम केल्यावाचून पर्याय नाही
बर्‍याच वेळेला मीच कशाला करायला हवे हे काम असे म्हणत आपण दुसर्‍याकडे बोट दाखवतो. घरातले काम असेल तर भाऊ करू शकतो किंवा बहीण करू शकते, हे काम त्याला/तिला सांग, ऑफिसमध्ये आपण सहकार्‍याला काम करायला सांगतो. पण हे तुम्ही केवळ जबाबदारी टाळण्यासाठी म्हणत असाल तर लक्षात ठेवा यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे कारण जेव्हा भविष्यकाळात असेच एखादे काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते व ते काम करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो तेव्हा तुम्हांला दुसर्‍याला विचारावे लागते की कसे करू किंवा हे काम करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणती काळजी घ्यावी. त्यावेळी कदाचित या सर्व गोष्टींसाठी हवा तेवढा वेळ मिळू शकणार नाही त्यामुळे ते काम बिघडू शकते. यासाठी जेव्हा तुम्ही एखादे काम टाळण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा हे काम मलाच करावे लागेल, मला हे काम केल्यावाचून पर्याय नाही असा विचार करा म्हणजे तुम्हांला ते काम करताना त्रास वाटणार नाही.

No comments:

Post a Comment