जरूर वाचा
आपण पाहिले की प्रत्येक लहान-मोठी जबाबदारी आपण उचलायला हवी, प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाचीच आहे, गरजेचीच आहे, ही जबाबदारी मीच पूर्ण केली पाहिजे, आत्ताच्या आत्ताच पूर्ण केली पाहिजे असा विचार करणे खूप गरजेचे आहे. कदाचित तुम्ही घेतलेली जबाबदारी किंवा काम हे महत्त्वाचे नसेल, गरजेचे नसेल, तुम्हांला त्यातून काही फायदा होणार नसेल पण तरीदेखील आपण ते केले पाहिजे कारण याठिकाणी आपण आपल्या मेंदूला घडवत आहोत, त्याला जास्त सतर्क बनवत आहोत.
            एखाद्या रविवारी तुम्ही दिवसभर निवांत बसून आहात, काही काम नाही. अशावेळी तुमचा मेंदू आळसावतो. जर संध्याकाळी एखादे काम आले तर ते टाळण्याचा आपण प्रयत्न करतो. हेच आपल्याला टाळायचे आहे म्हणून सुट्टीच्या दिवशी किंवा मोकळ्या वेळेत घरातील लहान सहान कामे आपण करत राहिलो तर आपला मेंदू नेहमी सतर्क राहतो. याचा आपल्याला निश्चितच मोठ्या आणि महत्त्वाच्या कामात फायदा होईल.

No comments:

Post a Comment