कॅरम बोर्ड थिअरी
कॅरम हा खेळ आपण सर्वांनीच खेळलेला आहे. समजा तुम्ही कॅरम मधले एक नंबरचे खेळाडू आहात. एकदा स्ट्रायकर तुमच्या हातात आला की बोर्डवरील सर्व सोंगट्या संपवल्याशिवाय तुम्ही थांबतच नाही इतके तुम्ही या खेळात निष्णात आहात. पण अशावेळी तुमच्या एकट्याच्याच हातात स्ट्रायकर असतो. समजा तुम्ही खेळत असतानाच इतर तिन्ही बाजूने तीन खेळाडूंच्या हातात स्ट्रायकर आहे. म्हणजेच एकाच कॅरमबोर्डवर चार खेळाडू एकाच वेळेला आपापल्या स्ट्रायकरने सोंगट्यांचा वेध घेत आहेत. अशावेळी तुम्ही खात्रीने सांगू शकता का की तुम्ही नेम धरलेल्या सोंगटीलाच तुमचा नेम लागेल? किंवा नेम लागलाच तर ती सोंगटी बोर्डच्या छिद्रातून खाली पडेल? कदाचित तुमचा नेम सोंगटीला लागणार नाही, कदाचित नेम लागलाच तर सोंगटी छिद्रात जाणार नाही, कदाचित तुमच्या स्ट्रायकरचा किंवा तुम्ही नेम धरून मारलेल्या सोंगटीचा धक्का लागून दुसर्‍या खेळाडूची सोंगटी बोर्डच्या छिद्रात जाईल किंवा कदाचित दुसर्‍या खेळाडूच्या स्ट्रायकरमुळे किंवा त्याने मारलेल्या सोंगटीमुळे तुमची सोंगटी छिद्रात जाण्यासाठी मदत होईल. अशा तसेच इतरही काही शक्यता याठिकाणी निर्माण होतील. आता तुम्ही विचार करत असाल या सर्वाचा इथे काय संबंध?
            खरंतर अशीच काहीशी परिस्थिती आपल्या आयुष्याची आहे. आपले जग म्हणजे कॅरमबोर्ड, आपण सारे एकाचवेळी खेळणारे खेळाडू आणि सोंगटी म्हणजे आपले ध्येय किंवा एखादे काम होय असे मानले तर वरील उदाहरणाशी असलेला संबंध तुमच्या लक्षात येईल. ज्याप्रमाणे वरील खेळात अनेक खेळाडू एकत्र खेळत असल्यामुळे आपला नेम लागण्याची शक्यता कमी होते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही आपले काम आपल्या योजनेप्रमाणे पूर्ण होईलच असे सांगता येत नाही. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत जर मुलाखतीसाठी गेला असाल तर त्याठिकाणी इतरही अनेकजण आलेले असतात. प्रत्येकाची क्षमता व ज्या पदासाठी ते आलेले आहेत त्या पदासाठी त्यांची असलेली योग्यता या अशा अनेक गोष्टींमुळे ती नोकरी आपल्याला मिळेलच असे सांगता येत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जर आपल्याला अपेक्षित यश मिळत नसेल याचा अर्थ आपल्यामध्ये काही कमतरता आहे असा होत नाही. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला किंवा इतर कोणालाही दोष देत बसू नका.
            क्रिया आणि प्रतिक्रिया तसेच कॅरम बोर्ड थिअरी हे दोन्ही मुद्दे वाचल्यावर आपल्या लक्षात येते की अनेकवेळा आपल्या नियंत्रणाबाहेरच्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण समाजात राहतो. समाजातील अनेक व्यक्ती रोज आपल्या संपर्कात येत असतात किंवा संपर्कात न येताही आपल्या जीवनावर प्रभाव पाडत असतात. रस्त्याने जाताना शेकडो वाहने आपल्या जवळून जात असतात. अशा व्यक्तींमुळेही आपल्या आयुष्यावर परिणाम घडू शकतात. ङ्क्तक वाईट उदाहरण घ्यायचे झाले तर रस्त्यावर दोन अनोळखी व्यक्तींचा होणारा अपघात. हा अपघात होण्यापाठीमागची कारणे ही त्या व्यक्तींच्या  स्वभावावर किंवा त्यावेळच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असू शकतात मात्र ङ्क्तकामुळे दुसर्‍यालाही परिणाम भोगावे लागतात. केवळ त्या दोन व्यक्तीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनादेखील परिणाम भोगावे लागतात. त्यांच्याही आयुष्यावर या घटनेचा परिणाम होतो. म्हणूनच आपले आयुष्य हे ङ्क्तकमेकांवर अवलंबून आणि फारच गुंतागुंतीचे आहे.

No comments:

Post a Comment